शेवगाव(अहमदनगर)- शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शेवगावकरांना १०-१२ दिवसांनी पाणी प्यायला मिळत आहे, त्याचा निषेध म्हणून आज शेवगावमधील क्रांती चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून जाहीर मुंडण आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्रा. किसन चव्हाण, संजय नांगरे,प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी बोलताना प्रा.किसन चव्हाण म्हणाले की, मिलबाटके खाणाऱ्या भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आता जनता योग्य धडा शिकवेल, धरण विशाल असू नये शेवकर यांना पाण्यासाठी हिंडावे लागते याचा निषेधही प्रा. किसन चव्हाण यांनी यावेळी केला. यावेळी सत्ताधारी नगरसेवक व राष्ट्रवादी नगरसेवक यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच शेवगाव नगरपरिषद नगरसेवकांमधील टक्केवारी, घराणेशाही, पाणीपट्टी वसुली, या विषयावर ही त्यांनी जोरदार टिका प्यारेलाल शेख यांनी टीका केली.