महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vijayawada Tirupati Express: शिर्डी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खास सोय! विजयवाडा तिरुपती एक्सप्रेस गाड्यांमधील डब्यांत कायमस्वरूपी वाढ - एक्सप्रेस गाड्यांमधील डब्यांत कायमस्वरूपी वाढ

ट्रेन क्रमांक 17208 व 17207 साईनगर शिर्डी - विजयवाडा एक्स्प्रेसला साईनगर शिर्डी येथून दि. २१ डिसेंबर २०२२ पासून आणि विजयवाडा येथून २० डिसेंबर २०२२ पासून एक अतिरिक्त द्वितीय वातानुकूलित कोच जोडण्यात येईल. (Vijayawada Tirupati Express) प्रवाशांसाठी अधिकची सोय मध्य रेल्वेने केलेली आहे.

विजयवाडा तिरुपती एक्सप्रेस
विजयवाडा तिरुपती एक्सप्रेस

By

Published : Dec 20, 2022, 10:42 PM IST

मुंबई -ट्रेन क्रमांक 17208 व 17207 साठी सुधारित संरचना यात एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, (Vijayawada Tirupati Express)दोन द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल.

ट्रेन क्रमांक 17417व 17418 साईनगर शिर्डी - तिरुपती एक्स्प्रेसला एक अतिरिक्त शयनयान डब्बा साईनगर शिर्डी येथून असेल .हा डबा दि. २१ डिसेंम्बर २०२२ पासून आणि तिरुपती येथून दि. २० डिसेंम्बर २०२२ पासून जोडण्यात येईल.

ट्रेन क्रमांक 17417 व 17418 साठी सुधारित संरचना अशी असेल एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, एक पॅंट्री कार, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह दोन गार्ड ब्रेक व्हॅन असणार. वरील गाड्यांमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती आहे की त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासावी.

ABOUT THE AUTHOR

...view details