अहमदनगर - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मोऱ्याद्वारे ४ हजार क्युसेकने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरण क्षेत्रात पावसाची संततदार असल्याने यावर्षी धरण लवकर भरले आहे.
मुळा धरण 'ओव्हरफ्लो', जायकवाडीत ४ हजार क्युसेकचा विसर्ग - २६ टीएमसी
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मोऱ्याद्वारे ४ हजार क्युसेकने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.
मुळा धरण ओव्हरफ्लो
मागील वर्षी कमी पावसामुळे मुळा धरण ८० टक्केच भरले होते. मात्र, या वेळी पावसाची कृपा झाल्याने २६ टीएमसी क्षमता असलेले मुळा धरण लवकर भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.