अहमदनगर -केंद्र सरकारने स्वीकारलेल्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या ( MSEDCL Employee Strike ) संयुक्त मंचाने २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. वीज कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले आहेत. या संपात महावितरणचे जवळपास सव्वाशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.
MSEDCL Employee Strike : राज्य सरकारच्या इशाऱ्यानंतरही वीज कर्मचारी संपावर, मेस्मा अंतर्गत कारवाई तयारी? - महावितरण कर्मचारी मागण्या
केंद्र सरकारने स्वीकारलेल्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या ( MSEDCL Employee Strike ) संयुक्त मंचाने २८ आणि २९ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने मेस्मा कायदा ( Mema Act On MSEDCL ) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कर्मचाऱ्यांवर मेस्मा -संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत ( Mema Act On MSEDCL ) कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. असे असतानाही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून अनेक कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांना राज्याच्या ऊर्जा विभागाने तसेच राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी वीज कंपन्यांच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. मात्र, खासगीकारणाची टांगती तलवार असल्याने हे विद्युत कर्मचारी संपात सहभागी झाल्याच बघायला मिळते आहे.
हेही वाचा -Nitin Raut on Strike : वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा- नितीन राऊत यांचे आवाहन