महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार सुजय विखेंसह सदाशिव लोखंडेंच्या अभिनंदनाचे फ्लेक्स फाडले; युतीचे कार्यकर्ते संतप्त - खासदार सुजय विखे-पाटील

फ्लेक्स बोर्ड फाडलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांचे फाडलेले फ्लेक्स

By

Published : May 28, 2019, 1:17 PM IST

अहमदनगर - नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड अज्ञात व्यक्तीने फाडले. संगमनेरलगत असलेल्या घुलेवाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विखे आणि लोखंडे यांचे फ्लेक्स फाडलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी

संगमनेर तालुक्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना संगमनेरमधून साडेसात हजारापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले होते. तसेच नगर-दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्याही अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले होते. घुलेवाडी मध्येही हे बोर्ड लावण्यात आले होते. मात्र, कोणीतरी अज्ञाताने सोमवारी मध्यरात्री हे बोर्ड फाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भाजप-शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित आहे. फ्लेक्स बोर्ड फाडलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. सध्या पोलीस आणि कार्यकर्ते समोरासमोर उभे आहे. आता यामधून काय मार्ग निघतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details