शिर्डी (अहमदनगर) -रामनवमीचे औचित्य साधून शिर्डी येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना विखे पाटील परिवाराच्या वतीने आज (बुधवार) पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण देण्यात आले. खासदार सुजय विखे यांनी स्वत: उपस्थित राहून रुग्णांच्या आरोग्याची विचारपुस केली आहे. यावेळी सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राजकीय नेत्यांवर भाष्यही केले.
टीव्हीवर येवून बोलण्यापेक्षा रेमडेसिवीर उपलब्ध करुन रुग्णांचे प्राण वाचवा - सुजय विखे पाटील
रेमडेसिवीर आणि ऑक्सीजन मिळविण्यात वेळ घातला असता तर राज्यातील तुटवडा कमी झाला असता. आज राजकारण्यांनी रोज टिव्हीवर येवून बोलण्यापेक्षा रेमडेसिवीर उपलब्ध करुन रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ऑक्सीजनच्या कंपन्यांना जिल्हे वाटून देण्याचा निर्णय अचानक घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
'रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य द्यावे'
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी दररोज कॅमेऱ्यासमोर येवून आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा रेमडेसिवीर आणि ऑक्सीजन मिळविण्यात वेळ घातला असता तर राज्यातील तुटवडा कमी झाला असता. आज राजकारण्यांनी रोज टिव्हीवर येवून बोलण्यापेक्षा रेमडेसिवीर उपलब्ध करुन रुग्णांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ऑक्सीजनच्या कंपन्यांना जिल्हे वाटून देण्याचा निर्णय अचानक घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एफडी अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात गेले होते. क्षेत्रफळाने मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याला तीन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री मिळाले असतांनाही ते केवळ बैठका घेवून फोटो काढण्यात मग्न असतात, असा आरोप यावेळी सुजय विखे यांनी केला आहे. या दरम्यान खासदार सुजय विखे पाटील यांनी रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. उपस्थित वैद्यकीय अधिकारी व महसूल विभागाला कोव्हीड सेंटर मधील अधिकच्या बेडची संख्या वाढविण्याबाबत तसेच इतर आरोग्य सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली आहे.
हेही वाचा-नाशिकमधील डॉ. झाकीर हॉस्पिटलमध्ये २२ रुग्ण दगावले, ऑक्सिजनच्या टॅंकमधून झाली होती गळती