अहमदनगर - नगर मनमाड मार्गाची दुरवस्था झाल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या व जिल्ह्यातील इतर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगाव ते कोल्हार रस्त्यावरील टोल नाक्यावर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे याच्या उपस्थितीत शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. खड्डे दुरुस्त होईपर्यंत टोल वसूल करु नये. असा इशारा लोखंडे यांनी दिला.
अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शिवसेनेने टोल नाक्याला ठोकले टाळे हेही वाचा -'ई टीव्ही भारत'च्या वृत्तानंतर कचरा प्रश्नावरून शिवसेना आक्रमक; महापालिका आयुक्तांना दिले गाजर भेट
पिप्री निर्मळ येथील टोल नाक्याला टाळे -
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थस्थान असलेल्या शिर्डीला राज्यातील अनेक भागातून जोडणाऱ्या नगर मनमाड रस्त्यावर सर्वत्र खड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन कराव लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याकडे दुर्लक्ष करत टोल वसुली जोरात सुरू आहे. या विरोधात गुरूवारी शिवसेनेने आवाज उठवत शिर्डीचे खासदार लोखंडे यानी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून देखील पिप्री निर्मळ येथील टोलनाक्यावर तुम्ही टोल आकारत आहात. टोल तुम्ही बंद करा अन्यथा शिवसेना आपल्या पध्दतीने टोलनाका बंद करू, असा इशारा त्यांनी जागतिक बँकेचे प्रकल्प उपअभियंता ए. जी. मेहत्रे यांना दिला.
हेही वाचा -महाराष्ट्राचा 'कर्नाटक' होऊ देणार नाही, राऊतांचा इशारा