अहमदनगर- वाराणसीच्या धर्तीवर शिर्डीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. ते शिर्डी येथे पत्रकारांशी बोलत होते.
वाराणसीच्या धर्तीवर शिर्डीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार - खा.सदाशिव लोखंडे - Sadashiv Lokhande
शिर्डीचा खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन वाराणसीच्या धर्तीवर विकासकामे सुरु करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.
![वाराणसीच्या धर्तीवर शिर्डीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार - खा.सदाशिव लोखंडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3744524-230-3744524-1562238556834.jpg)
MP
खासदार सदाशिव लोखंडे
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी येथे आले होते. शिर्डीचा खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून वाराणसी मतदारसंघात सुरु असलेल्या कामांच्या धर्तीवर शिर्डीत विकासकामे सुरु करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
वाराणसी येथे जाऊन तिथे सुरु असलेल्या कामांची लवकरच पाहणी करणार असून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सदाशिव लोखंडे यावेळी म्हणाले.