अहमदनगर : शिर्डीत गेल्या दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला राष्ट्रवादीच्या दिगग्ज नेत्यांनापासून प्रकृती बरी नसलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. मात्र या शिबिराकडे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( ( NCP MP Amol Kolhe ) ) यांनी पाठ फिरवली असल्याचे पहायला मिळत आहे.तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झळकले आणि आज अचानक ते आपल्या आजोळी निघून गेले, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
पक्षाच्या कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज - साईबाबांच्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काल पासुन दोन दिवसीय मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते हजर आहेत. मात्र राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांनी मंथन शिबिराकडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मंथन शिबिरात हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती या विषयावर बोलणार होते. मात्र वेळेअभावी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी होती. तसेच पक्षाच्या कार्यपद्धतीवरही कोल्हे नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे कोल्हे यांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.