महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर: मुळा धरणात आई आणि मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू - mother and son death

सध्या मुळा धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याच बोलल जात आहे. पूजा गणेश सातपुते (वय ३६) आणि त्यांचा मुलगा ओंकार (वय १३) या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू  झाला आहे. तर वडील गणेश सातपुते हे बचावले आहेत.

आई आणि मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

By

Published : Sep 16, 2019, 6:08 AM IST

अहमदनगर- जिल्ह्यातील राहुरी जवळ असणाऱ्या मुळा धरणात मायलेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील हे बचावले आहेत. रविवारची सुट्टी असल्याने हे कुटुंब एकत्र सोबत फिरायला गेले होते. पाण्याचा अंदान न आल्याने ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा- इंदोरीकर महाराज राजकारणात? अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण

सध्या मुळा धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याच बोलले जात आहे. पूजा गणेश सातपुते (वय ३६) आणि त्यांचा मुलगा ओंकार (वय १३) या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर वडील गणेश सातपुते हे बचावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details