अहमदनगर- कोरोनाने पुन्हा एकदा मोठा कहर केला असून गुरुवारी गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 1 हजार 338 जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक 1618 जण बाधित आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतील गुरुवारची ही संख्या उच्चांकी आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे. एकट्या नगर शहरात गुरुवारी 24 तासात 457 जणांचा कोरणा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याने महापालिका प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून दर दिवशी बाधितांची संख्या पहिल्या दिवशी पेक्षा जास्त होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरासरी शंभर रुग्णांची संख्या मार्च संपत असताना सरासरी आठशेवर गेली आहे.
सर्दी खोकला तापाच्या रुग्णांमध्ये वाढ-
सर्दी, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने अशा रुग्णांच्या कोरोना चाचण्यांमधील वाढ झाल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या सरकारी व खासगी रुग्णालयात मिळवून 4799 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी संपलेल्या चोवीस तासात 1338 जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळांमध्ये 511 खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटिजेन चाचणीत 172 रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यात अहमदनगर शहरात सर्वाधिक 457 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी 660 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 80 हजार 96 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.20 टक्के इतके झाले आहे.
गुरुवारचे पॉझिटिव्ह रुग्ण-