अहमदनगर -राज्य शासनाच्या आदेशाने साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ९१ हजार १३६ साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईप्रसादालयामध्ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
१६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ९१ हजार १३६ साईभक्तांनी ऑनलाइन, टाइम बेस व सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातून साईदर्शनाचा व साईप्रसादालयामध्ये सुमारे १ लाख १० हजार साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच याकालावधीत संस्थानचे साई आश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, साईबाबा भक्तनिवास्थान व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे २१ हजार १२४ साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.