महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2020, 12:14 PM IST

ETV Bharat / state

COVID19 : अहमदनगर जिल्ह्यात २२८ रुग्णांना डिस्चार्ज, २४ तासांत ४२८ नव्या रुग्णांची भर

जिल्ह्यात गुरुवारी तब्बल २२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे

Ahmednagar corona updates
Ahmednagar corona updates

अहमदनगर- जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी तब्बल २२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे.

गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रुग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये संगमनेर ०६- निमोण ५, जोरवे १, श्रीगोंदा ०१- पिंपळगाव पिसा, नगर ग्रामीण ०१- चास, अहमदनगर शहर -०३, सारस नगर ०३, पाथर्डी ०२- पाथर्डी शहर ०१, पागोरी पिंपळगाव ०१, नेवासा -०१, तारवाडी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत १२६ जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर २२, राहाता ०१, पाथर्डी २२, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा १६ आणि कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोनाच्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा १८६, कर्जत ०२, राहुरी ०४, अकोले ०१, श्रीगोंदा ०२, नेवासा ०२, श्रीरामपूर ०३, नगर ग्रामीण ०९, पाथर्डी ०७, राहाता १२, संगमनेर ०७, पारनेर ०७, शेवगाव ०३ आणि जामखेड येथील ०३ रुग्णाचा समावेश आहे.

२२८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला-
मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा. २५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले येथील ०२ रूग्णांना तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेले आणि आता बरे झालेल्या ०६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

कोरोनाचा जिल्ह्यातील तपशील

बरे झालेली रुग्ण संख्या - २९४९
उपचार सुरू असलेले रुग्ण - १६०४
मृत्यू - ६०
एकूण रुग्ण संख्या - ४६१३

ABOUT THE AUTHOR

...view details