महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्यंविधिसाठी मोफत लाकडे द्या म्हणत मनसे कार्यकर्त्यांचा खा. लोखंडेंना घेराव - अहमदनगर जिल्हा लेटेस्ट न्यूज

मनसेच्या कार्याकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना घेराव घातला. कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. कोपरगावमध्ये कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजनचा साठा तसेच रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही. रुग्णांना बेड भेटत नाही. एवढच काय मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी लाकडे खरेदी करण्याची देखील परिस्थिती नाही. त्यामुळे आम्हाला अंत्यविधीसाठी मोफत लाकडे द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मनसे कार्यकर्त्यांचा खा. लोखंडेंना घेराव
मनसे कार्यकर्त्यांचा खा. लोखंडेंना घेराव

By

Published : Apr 18, 2021, 3:30 PM IST

अहमदनगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याकर्त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना घेराव घातला. कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. कोपरगावमध्ये कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजनचा साठा तसेच रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही. रुग्णांना बेड भेटत नाही. एवढच काय मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी लाकडे खरेदी करण्याची देखील परिस्थिती नाही. त्यामुळे आम्हाला अंत्यविधीसाठी मोफत लाकडे द्या, रुग्णालयात कोरोना रुग्णांना सुविधा पुरवा, अन्यथा आम्हाला पॉईझनच्या बाटल्या द्या असं या मनसे कार्यकर्त्याने खासदार सदाशिव लोखंडे यांना म्हटले आहे.

मनसे कार्यकर्त्यांचा खा. लोखंडेंना घेराव

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहालाता कोल्हे, नगराध्यक्ष, सर्व शासकीय अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांची उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी खासदार लोखंडे यांना घेराव घातला.

शाई फेकण्याचा प्रयत्न

दरम्यान तीन दिवसांपूर्वी नेवासा येथे कोरोनाच्या संदर्भात बैठक सुरू असताना, खासदार लोखंडे यांच्यावर वंचित बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. नेवासा पंचायत समिती कार्यालयामध्ये गुरुवारी 15 एप्रिल रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सुखदान यांनी लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वी पोलिसांनी त्यांना शाईच्या बाटलीसह ताब्यात घेतले.

हेही वाचा -राज्यात शनिवारी 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 419 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details