महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरण : आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार; राजकारण तापण्याची शक्यता - जैनमुनी स्वागत फलक

शहरात जैन धर्माचे आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत विविध संस्था-संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरणी आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार

By

Published : Jun 10, 2019, 9:45 AM IST

अहमदनगर- शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱया नेता सुभाष चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा जैनमुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. फलक चोरीला गेल्याची तक्रार आमदार जगताप यांच्याकडून कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरणी आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार; राजकारण तापण्याची शक्यता

शहरात जैन धर्माचे आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत विविध संस्था-संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. आमदार जगताप यांनीही जैनमुनींच्या स्वागताचा फलक नवीपेठ जैन स्थानक, नेतासुभाष चौकात लावला होता, पण रविवारी रात्रीच्या सुमारास सदर फलक अज्ञातांनी काढून टाकला. हा फलक काही विघ्नसंतोषी, गलिच्छ लोकांनी काढून त्याजागी त्यांचा फलक लावल्याची तक्रार आमदार जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासून आरोपींचा शोध लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी पेठ-नेता सुभाष चौक हा शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथून जैनमुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने शहरात राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. यादरम्यान शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि जगताप यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जगताप-राठोड आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाची संधी कुणीही सोडत नाहीत. महानगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेल्या आग प्रकरण ताजे असतानाच आता फलक चोरीला गेल्याचा विषय पुढे आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details