अहमदनगर -अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( MLA Sangram Jagtap car accident ) यांच्या बीएमडब्ल्यू कारचा मुंबई जवळ रसायनी या ठिकाणी एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार जगताप ( MLA Sangram Jagtap news ) यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले. गाडीतील एअरबॅग तातडीने उघडल्याने गाडीमधील प्रवास करत असलेले आमदार जगताप आणि इतरांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा -Farah Khan in Shirdi : साई बाबांकडे काय मागितले? फराह खानने मिश्किल उत्तर देत म्हटले, मी बाबांकडे...
आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास रसायनी जवळ आमदार जगताप यांची कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यातून कारमधील आमदार संग्राम जगताप यांच्यासह सर्वजण सुखरूप बचावले असून, आता आमदार जगताप हे मुंबईत पोहचले असल्याची आणि ते सुखरूप असल्याची माहिती नगरमधील त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आलेली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने आमदार जगताप मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन नगर शहर मतदारसंघातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा -धडाकेबाज कामगिरी : तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना पाजले पाणी, पाहा व्हिडिओ