अहमदनगर- मराठा आरक्षण मुद्द्यावर 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय ऐकून वाईट वाटत असून आरक्षण मिळाले असते तर समाजाचा मोठा फायदा झाला असता ,अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
राजकारण न करात सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र येत युवा वर्गाच्या बाजुने निर्णय घ्यावा
मात्र, यात आता कोणीही राजकारण करू नये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून मराठा समाजातील युवा वर्गाला नोकरी, शिक्षण यासाठी काय करता येईल यावर विचार केला पाहिजे, असे आमदार पवार म्हणाले. मराठा आरक्षणाचा लढा हा राजकीय नव्हता तर समाजातील युवक युवतींनी उभा केलेला लढा होता. त्यामुळे कोणीही राजकारण न करता आता युवा वर्गासाठी काय करता येईल त्यावर चर्चा करावी.