अहमदनगर- अनिल देशमुख यांनी राजीनामा भाजप नेते आरोप करतात म्हणून दिला नव्हता, तर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यामुळे देशमुख यांनी नैतिकतेने व चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून राजीनामा दिला आहे. आता न्यायालयाचे सीबीआय चौकशीवर लक्ष असेल ही अपेक्षा आहे, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी एका प्रकारे सीबीआय चौकशीवर संशयाची सुई ठेवली आहे.
सीबीआयने चौकशीत राजकारण आणू नये