अहमदनगर - आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथे आयोजित केलेल्या जनता सवांदात शहर व तालुक्यातील नागरिकांनी विविध खात्यासंदर्भात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, कचरा डेपो, अतिक्रमण, क्रीडा संकुल या विभागांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. बांधकाम विभाग व महावितरण विभागाच्या गावागावात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सात दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रम स्थळी शेकडो तक्रारदार दाद मागण्यासाठी ठिय्या देऊन होते. निवेदनांवर आणि प्रत्यक्ष मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्काळ आदेश देऊन हे प्रश्न निर्गमित केले. यावेळी जनता संवादाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत एकूण १२० तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरुपातील तक्रारी नागरिकांनी पवार यांना दिल्या.
हेही वाचा -...अन् आमदार पतीच्या ढोलकीवर खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका