अहमदनगर- प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. त्याच प्रमाणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. त्यासाठी त्यांनी बारामती अॅग्रोची मदत घेतली आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटर सॅनिटायझरचा पुरवठा, आमदार पवारांचे योगदान - आमदार रोहित पवार
फक्त कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातच नाही, तर संपूर्ण राज्यात सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची योजना आखली. ही योजना पूर्ण करण्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि बारामती ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने काम सुरू करण्यात आले. या संस्थांमार्फत आतापर्यंत राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये सरकारी रुग्णालये, पोलीस स्टेशन, वैद्यकीय संस्था, धार्मिक संस्था, सरकारी कार्यालये या ठिकाणी तब्बल ४० हजार लीटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्येच बाजारात सॅनिटायझर्सचा तुटवडा भेडसावू लागला. तसेच अनेक ठिकाणी सॅनियाटझर्सचा काळाबाजारही सुरू झाला. सॅनिटायझरची वाढती गरज, उपयुक्तता आणि त्यांचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन आमदार रोहित पवार पुढे सरसावले. त्यांनी फक्त कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातच नाही, तर संपूर्ण राज्यात सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची योजना आखली. ही योजना पूर्ण करण्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि बारामती ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने काम सुरू कऱण्यात आले. या संस्थांमार्फत आतापर्यंत राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये सरकारी रुग्णालये, पोलीस स्टेशन, वैद्यकीय संस्था, धार्मिक संस्था, सरकारी कार्यालये या ठिकाणी तब्बल ४० हजार लीटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे.
यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. सॅनिटायझरबरोबरच मास्क आणि संसर्गाला प्रतिबंध करणारे चष्मे यांचं उत्पादनही या संस्थांमार्फत केले जात असून या गोष्टी वैद्यकीय संस्था, रुग्णालयं इथे पोहोचवल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, बारामती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सॅनिटायझरचे वाटप झाले आहे. एकट्या मुंबईतच चार हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती जामखेड एकात्मिक संस्थेने दिली.