अहमदनगर- जीएसटीचे पैसे केंद्र देत नाही, फडणवीस यांच्या काळात एलबीटी रद्द झाली. त्याचेही 26 हजार कोटींचे राज्याला नुकसान झाले असताना महाराष्ट्रातील भाजप नेते याबद्दल बोलत नाहीत. हे भाजपचे धोरण आहे की हे नेते दिल्लीला घाबरतात? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.
'भाजप नेत्यांना जनतेचा कळवळा असता तर केंद्रातून जीएसटीचे पैसे आणले असते' - रोहित पवार लेटेस्ट न्यूज
राज्याचे जीएसटीचे पैसे मिळत नाहीत. एलबीटी रद्द करून राज्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यासाठी महाराष्ट्रातील नेते केंद्राकडे का आवाज उठवत नाहीत? ही भाजपची पॉलिसी आहे की नेते आवाज उठवण्यास भीत आहेत, असा प्रश्न रोहित यांनी उपस्थित केला.
शनिवारी भाजपच्यावतीने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याबद्दल रोहित म्हणाले की भाजप फक्त राजकारण करत आहे. कोरोनाच्या काळात केंद्रातील भाजप सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असताना त्याबाबत मात्र ते काही बोलत नाहीत. राज्याचे जीएसटीचे पैसे मिळत नाहीत, एलबीटी रद्द करून राज्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यासाठी महाराष्ट्रातील नेते केंद्राकडे का आवाज उठवत नाहीत, ही भाजपची पॉलिसी आहे की नेते आवाज उठवण्यास भीत आहेत, असा प्रश्न रोहित यांनी उपस्थित केला. त्यामुळे भाजपने राजकारण न करता राज्याला पूरक असे धोरण घ्यावे, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना व्यक्त केली.