अहमदनगर- शरद पवार पार्थ पवारांबद्दल जे बोलले तो आमचा कौटुंबीक विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल इतरांनी बोलून काही फायदा नाही, असे विधान आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये केले. तसेच सध्या पार्थ पवार या महत्वाचा विषय नसून बिहार निवडणुकांची जबाबदारी भाजप कोणावर सोपवतंय हे महत्वाचे आहे, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.
पार्थ हा आमचा कौटुंबीक विषय - आमदार रोहित पवार - bihar elections
शरद पवार पार्थ पवारांबद्दल जे बोलले तो आमचा कौटुंबीक विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल इतरांनी बोलून काही फायदा नाही, असे विधान आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये केले.
![पार्थ हा आमचा कौटुंबीक विषय - आमदार रोहित पवार mla rohit pawar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8426361-502-8426361-1597461813246.jpg)
अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित यांनी पार्थ पवार यांची बाजू सांभाळून घेतली. सध्या बिहार निवडणुकीत प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती चर्चेत आहे. यावर रोहित यांनी विधान केले. सुशांतसिह राजपुत आत्महत्या प्रकरणावरून त्यांनी भाजपवर राजकारण करत असल्याची टीका केली. ते म्हणाले, की हा विषय राजकारण करण्याचा मुळीच नाही. सुशांतसिंहला न्याय मिळायला हवा, त्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशिल आहेत आणि ते योग्य रितीने तपास करत आहेत, असे रोहित यांनी सांगितले. भाजपला सुशांतसिंह प्रकरणाचा बिहार निवडणुकीत फायदा करून घ्यायचा असल्याने ते राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढत असल्याची टीका रोहित यांनी केली.