अहमदनगर-लॉकडाऊनमुळे इतर राज्यांमधील अडकून पडलेल्या मजुरांना विशेष रेल्वेने गावी पाठवण्यात येत आहे. या कामगारांना रेल्वेस्थानकापर्यंत बसद्वारे पोहोचवण्याचे काम लंके प्रतिष्ठान करत आहे. अशाच एका बसचे सारथ्य आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
आमदार लंके स्थलांतरित कामगारांसाठी बनले सारथी; बसने पोहोचवले रेल्वे स्थानकावर नगर-पुणे रस्त्यावर असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीतील अनेक कामगार लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परिसरात अडकून पडले होते, अखेर या कामगारांसाठी पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके हे तालुक्यात अडकलेल्या आणि आपल्या गावी परतू पाहणाऱ्या कामगारांसाठी धावून आले.
तालुका प्रशासनाच्या माध्यमातून मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी जाण्यासाठी मध्य रेल्वेने अनेक काममगारांना त्यांच्या गावी पाठवण्याचे काम सध्या सुरू केले आहे. असून यासाठी नगरच्या रेल्वे स्थानकापर्यंत बसेसची व्यवस्था लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे.
पारनेर तालुक्यातील 12 निवारागृहांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील कामगारांची सोय करण्यात आली होती. त्यापैकी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील मजुरांना विशेष रेल्वेने सोडण्यात येत असल्याचे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.