महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार लंकेंनी घेतले ग्रामीण रुग्णालयात उपचार; साधेपणा पुन्हा चर्चेत - MLA Lanka took treatment at a rural hospital

आमदार लंके मतदारसंघात कामानिमित्ताने फिरत असताना त्यांना सर्दी-खोकला आणि घशात तडतड होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी तपासणी करण्याचे ठरवले. टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्यांनी स्वतः रांगेत उभे राहून केस पेपर काढला आणि केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतली. आ.लंकेच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल केला असून यामुळे आमदार लंके यांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

MLA Lanke's took treated in a rural hospital ; Simplicity re-discussed
आमदार लंकेंनी घेतले ग्रामीण रुग्णालयात उपचार; साधेपणा पुन्हा चर्चेत

By

Published : Oct 5, 2021, 5:04 PM IST

Updated : Oct 5, 2021, 8:27 PM IST

अहमदनगर - पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या साध्या राहणीमानाची चर्चा ऐकून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या हंगा गावातील चाळीतील दोन खोल्यांच्या घरात जाऊन लंके कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. काल (सोमवारी) आमदार लंके मतदारसंघात कामानिमित्ताने फिरत असताना त्यांना सर्दी-खोकला आणि घशात तडतड होण्याचा त्रास जाणवू लागला.

आमदार लंकेंनी घेतले ग्रामीण रुग्णालयात उपचार

साधेपणा पून्हा चर्चेत -

अस्वस्थपणा जाणवत असल्याने तपासणी करण्याचे ठरवले. यावेळी कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्वर मधील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला, मात्र आमदार लंके यांनी नेहमी प्रमाणे शासकीय रुग्णालयात तपासणी आणि उपचार घेण्याचे ठरवले. टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्यांनी स्वतः रांगेत उभे राहून केस पेपर काढला आणि केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली. आमदार लंकेच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला असून यामुळे आमदार लंके यांचा साधेपणा पून्हा एकदा चर्चेत आला आहे.

मी सामान्यच, लहानपणापासून सरकारी दवाखाना -

याबाबत, आ.लंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपण एका शिक्षकाचा मुलगा आहोत. लहानपणापासून खेड्यातील सरकारी दवाखान्यात आजारी पडल्यावर वडील नेत, त्याचा चांगला फरक पडत असे. त्यामुळे शासकीय दवाखान्यावर आपला आजही विश्वास आहे. आज लोकप्रतिनिधी असलो तरी शासकीय रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा असल्याने तिथेच उपचार घेणे मी पसंत करतो. आपण सगळ्यांनी शासकीय दवाखाने-रुग्णालये याचा उपयोग केला पाहिजे. सरकार यावर कोट्यावधी रुपये खर्च करते आणि आपण खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करतो. असे सांगत आमदार लंके यांनी जनतेने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन केले.

हेही वाचा -शरद पवारांनी दिली आमदार लंकेंच्या घरी भेट; नगरमध्ये पवार, गडकरी एकाच मंचावर

Last Updated : Oct 5, 2021, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details