अहमदनगर - जिल्ह्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ( Ahilyabai Holkar Jayanti 2022 ) साजरी करण्यात येत आहे. या जयंती उत्सवात आमदार गोपीचंद पडळकर ( MLA gopichand padalkar ) यांना बोलावण्यात आले नाही. तसेच पडळकर यांनी चौंडीतच जयंतीचा एक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली होती. ही परवानगीही नाकारण्यात आली. तरीही चौंडीत अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. ( Gopichand Padalkar Stopped by Police )
चौंडी येथे कार्यक्रम - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती उत्सव होत आहे. या उत्सवाला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, दत्तात्रेय भरणे, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब आदी उपस्थित आहे. मात्र या उत्सवात अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील 9 वे वंशज असलेल्या राम शिंदे यांना निमंत्रित केले नाही. तसेच गोपीचंद पडळकर यांनाही बोलावण्यात आलेले नाही.