अहमदनगर -आपल्या अष्टपैलू नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देताना दिवंगत विलासराव देशमुख यांनी सतत कार्यकर्ते जोडले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधू प्रमाणे प्रेम करणारे हसतमुख व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले दिवंगत विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे सदैव प्रेरणास्रोत ठरले असल्याचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितलं.
संगमनेर येथे आज दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, नितीन अभंग, रमेश गुंजाळ, आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, विविध प्रश्नांची जाण असणारे दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. विकास कामांची दूरदृष्टी, तत्परता, हसतमुख स्वभाव यामुळे राज्यातील जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज केले. विलासराव देशमुख यांनी सातत्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर व संगमनेर तालुका वर खूप प्रेम केले. त्यांनी नामदार थोरात यांना लातूर उस्मानाबाद ते 12 वर्षे पालकमंत्रीपद दिले.