महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

विविध शासकीय, निमशासकीय, औद्योगिक आणि सेवा संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागात तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालजवळ एकत्र येत सरकारच्या धोरणाविरोधी निदर्शने केली.

भारत बंद अहमदनगर प्रतिसाद
अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

By

Published : Jan 9, 2020, 4:32 AM IST

अहमदनगर - विविध शासकीय, निमशासकीय, औद्योगिक आणि सेवा संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरी भागात तसेच ग्रामीण जीवनावर या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालजवळ एकत्र येत सरकारच्या धोरणाविरोधी निदर्शने केली.

अहमदनगरमध्ये 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद, विविध संघटनांनी केले आंदोलन..

या भारत बंद मध्ये जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी नोकर, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगार संघटना, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नगर पालिका-महानगरपालिका कामगार संघटना, बँक, मेडिकल, शेतकरी संघटना, हमाल पंचायत, विविध डावे पक्ष आदी सहभागी होते. जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, या संघटनांनी काढलेल्या विविध मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होते.

हेही वाचा : ट्रकचालक खून प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त..

ABOUT THE AUTHOR

...view details