शिर्डी (अहमदनगर) - लखीमपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 11) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाविकास आघाडीतील पक्षाचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद पहायला मिळाले. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असलेल्या शिर्डीत बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही. शिर्डीतील सर्व व्यवहार सुरळीत होते.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणुन शिर्डीतील व्यवहार सुरसुरळीत सुरू
कोरोनाच्या काळात तब्बल दीड वर्षे साई मंदीर बंद असल्याने शिर्डीतील सर्व व्यवहार पूर्णता ठप्प झाले होते. 7 ऑक्टोबर रोजी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. आता कुठे तरी शिर्डीतील व्यवहार सुरळीत सुरू झालेत. तसेच शिर्डी येथे देशातील विविध ठिकाणाहून साईभक्त येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लखीमपूर घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
नेवासा तालुका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सुरू
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातील नेवासा, सोनई व शनिशिंगणापूर या महत्त्वाच्या गावात बंद पाळला गेला नाही. राष्ट्रीवादीचे नेते पांडुरंग अभंग यांचे वर्चस्व असलेल्या भेंडा आणि कुकाना या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचा दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांनची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर बंद मधून वगळण्यात आले होते.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोठी ताकत असलेल्या श्रीरामपूर शहर बंद नाहीच
श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. तसेच राष्ट्रवादीचीही तालुक्यात मोठी ताकत आहे. असे असतानाही श्रीरामपूर बंद नव्हते. मात्र बेलापूर शहर बंद होते.
शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांब्यात कडकडीत बंद
लखीमपूरच्या घटनेचा निषेध करत शेतकरी संपाची हाक देणाऱ्या शिर्डी जवळील पुणतांब्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यलाय जवळ उभारलेल्या शेतकरी पुतळाला पुष्पहार घालत गावातील चौकात लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
महसूलमंत्र्यांचा तालुका कडकडीत बंद