अहमदनगर -जामखेड शहरात राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केला. मुलीच्या आईने या बाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन पवार असे या आरोपीचे नाव आहे.
जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक - जामखेड अत्याचार न्यूज
जामखेडमध्ये राहणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या आईने गुरुवारी जामखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सचिन पवार याला अटक केली.
अत्याचाराची घटना मंगळवारी(21 जानेवारी) घडली होती. मात्र, याबाबत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पीडित मुलीच्या आईवर दबाव आणल्याची माहिती मिळत आहे. पीडित मुलीच्या आईने गुरुवारी जामखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सचिन पवार याला अटक केली.
हेही वाचा - समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार
पाच वर्षांची चिमुरडी शाळेतून घरी आल्यानंतर शेजारीच राहणाऱया सचिन पवारच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. या अत्याचारात पीडित चिमुरडी जखमी झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. जामखेड शहरात एकाच महिन्यात दोन अत्याचाराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.