राहुरी (अहमदनगर) - मुळा धरणग्रस्तांच्या समस्यांबाबत अचारसंहिता संपताच मंत्रालयात बैठक लावून चर्चा करून सर्व प्रश्न सोडविणार, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुळा धरणग्रस्त कृती समीतीला दिले आहे. त्यांन राहुरीत कृती समितीची भेट घेत हे आश्वासन दिले.
मुळा धरणग्रस्तांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले 'हे' आश्वासन
मुळा धरणग्रस्तांचे प्रश्न आपण गांभीर्याने सोडविणार असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र जयंत पाटील यांनी कृती समितीला दिले आहे.
निवेदन स्वीकारताना मंत्री जयंत पाटील
एकुण शिल्लक जागा, एकुण धरणग्रस्त संख्या आणि विशेष भरती प्रक्रिया व अशा विविध विषयावर चर्चा झाल्यावर हा विषय आपण गांभीर्याने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. सध्या पदवीधर मतदानाचा काळ असल्याने बैठकीला उशीर होऊ शकतो. पण, पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बैठक होईल, अशी अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले.