अहमदनगर - राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची ईडीकडून नोटीस बजावण्यात आली असून काहींची चौकशी सुरू आहे. ही चौकशी राजकीय प्रेरित असल्याचा आरोप करत ज्यांच्याविरोधात ईडीने नोटीस बजावली होती, त्यांचे काय झाले, असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त ते अहमदनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीवेळी काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचीही ईडीने नोटीस पाठवून त्यांचीही चौकशी केली आहे. मात्र, त्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर त्यांच्याविरोधातील आरोपांचे काय झाले. त्यांची चौकशी कुठपर्यंत आली, असा सवालही जयंत पाटील यांनी यांनी उपस्थित केला.
सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू
मंत्रिमंडळाती मंत्र्यांवर ओढून-ताणून आरोप करण्यात येत आहे. ईडी, सीबीआयकडे तक्रार देऊन सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरू असल्याचे आरोपही मंत्री पाटील यांनी केला आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाच्या आशीर्वादाने ते सर्वजण शाबूत आहेत. आमच्याकडे सर्वांची यादी असून लवकरच समोर आणू, असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनाही ईडीने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, भाजपात गेल्यापासून त्या नेत्यांवर ईडी, आयकर विभाग व सीबीआयचे संरक्षण असल्याचाही आरोप पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा -हिवरेबाजारमध्ये शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण; पालकासंह विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा