अहमदनगर -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध गावांना भेट देत कोरोनामुक्तीसाठी विविध अभियान राबविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व विविध सूचना केल्या.
मंत्री थोरातांनी घरोघर तपासणीसह कोरोनामुक्त गाव अभियानासाठी जनजागृती करण्याच्या दिल्या सूचना - संगमनेर कोरोना बातमी
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध गावांना भेट देत कोरोनामुक्तीसाठी विविध अभियान राबविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व विविध सूचना केल्या.
यावेळी थोरात म्हणाले, प्रशासन आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असून ग्रामीण भागातही संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी. कुणाला काही लक्षणे आढळली तर तातडीने विलगीकरण करा. मागील एक वर्षापासून कोरोनाचे संकट आपल्यावर आहे. याबाबत माहिती असूनही अनेक जण निष्काळजीपणा करत आहेत. आजाराची कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने जवळच्या प्रशासकीय अधिकारी किंवा गावातील पदाधिकार्यांना कल्पना द्या. स्वत:चे विलगीकरण करा. कारण कुटुंबात एकाला बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते आणि मग त्या कुटुंबावर मोठे संकट येते. याकाळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरगुती समारंभ पूर्णपणे टाळा. या संकटात संगमनेरमधील प्रशासन व विविध सहकारी संस्था आणि यशोधन कार्यालय हे आपल्या मदती करता तत्पर आहे. गरज असेल तेथे तातडीने संपर्क करा. कोरोना साखळी तोडणे हे काम प्रत्येकाने राष्ट्रीय कार्य म्हणून हाती घ्या, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'जो चुकीचा वागला त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणीही असो'