अहमदनगर - विधिमंडळ तालिकाध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले होते. हे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले (SC Canceled 12 MLA Suspension) आहे. यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आता राज्यपालांनी मंजुरीसाठी प्रलंबित ठेवलेले आमचे बारा आमदारांबाबत असलेल्या याचिकेवर असाच निर्णय घेईल असे मला वाटते. अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली.
वाईन आणि मद्यातला फरक विरोधीपक्षांनी समजून घ्यावा-
राज्य मंत्रिमंडळात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीवर भाजपकडून होत असलेल्या टीकेवर बोलताना थोरात यांनी विरोधकांना मद्य आणि वाईनमधला फरक समजला नसल्याचा टोला लगावला. नाशिक भागात द्राक्षाचे मोठे उत्पादन असून, अनेक वायनरी आहेत. यातून शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.