अहमदनगर- राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांची त्यांनी भेट घेतली. आपण अण्णांशी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहे. अण्णांचा जलसंधारण, शेतकरी प्रश्न आदी विषयासंदर्भात त्यांचा अभ्यास आहे आणि त्यामुळेच अण्णांच्या सोबत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
राज्यमंत्री बच्चू कडू अण्णा हजारे यांच्या भेटीला - बच्चू कडू लेटेस्ट न्यूज
बच्चू कडू राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे नेमके अण्णांसोबत ते कोणत्या मुद्यांवर चर्चा करणार याबद्दल उत्सुकता असणार आहे.
कालच (शुक्रवारी) अण्णा हजारे यांनी आपले ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला होता. अण्णा आंदोलनावर ठाम राहणार असे एकंदरीत मतप्रवाह असताना काल (शुक्रवार) केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बनराव पाचपुते यांची अण्णांसोबत दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यानंतर अण्णांनी आज (शनिवार) गांधी जयंती पुण्यतिथी निमित्त आपले सुरू होणारे उपोषण आंदोलन स्थगित केल्याचे घोषित केले. एकूणच या पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले असून ते राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे नेमके अण्णांसोबत ते कोणत्या मुद्यांवर चर्चा करणार याबद्दल उत्सुकता असणार आहे.