महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Guru Pournima In Shirdi : दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता - occasion of Guru Poornima

साईबाबा संस्थानात ( Sai Baba Sanstha Shirdi ) गुरु पूर्णिमा उत्सवाची ( Gurupournima ) सांगता करण्यात आली. तीन दिवस हा उत्सव साई संस्थांनच्या वतीने विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला.

Guru Pournima In Shirdi
शिर्डीत गुरुपौर्णिमा

By

Published : Jul 14, 2022, 6:11 PM IST

शिर्डी -शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी फोडून तीन दिवस चाललेल्या गुरु पूर्णिमा उत्सवाची मोठ्या उत्साहात आज सांगता करण्यात आली. साईबाबा संस्थानच्या ( Sai Baba Sanstha Shirdi ) वतीने 12 जुलै मंगळवार पासून गुरु पूर्णिमा ( Gurupournima ) उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला होता. तीन दिवस हा उत्सव साई संस्थांनच्या वतीने विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला. आज गुरुवारी उत्सवाच्या सांगता दिनी विश्वस्त मीना शेखर कांबळी यांनी सहपरिवार साईबाबांची पाद्य पूजा केली. तसेच गुरुस्थान मंदिरात साई संस्थांनचे विश्वस्त सचिन आहेर, त्यांच्या पत्नी स्मिता आहेर यांनी रुद्राभिषेक पूजा केली.

शिर्डीत गुरुपौर्णिमा साजरी

हेही वाचा -Shocking Video : दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव! विद्युत खांब आणि झाड कोसळले, काही क्षणामुळे वाचला तो..

साईमंदिरात काल्याच किर्तन - गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांगता दिवस असल्यान आज साईमंदिरात काल्याच किर्तन पार पडले. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थीत होते. झीम्मा, फुगडी खेळुन भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. किर्तनानंतर दहि-हांडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली. गुरुपौर्णिमेच्या तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त देश विदेशातील लाखो साई भक्तांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच साईप्रसादालयात सुद्धा अनेक साई भक्तांनी या तीन दिवसात साईप्रसाद भोजनाचा लाभ घेतला.


हेही वाचा -CM Shinde After Cabinet Meeting: आता पुन्हा नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार!

हेही वाचा -Guru Pournima In Shirdi: गुरूपौर्णिमा निमित्ताने लाखो भाविक शिर्डीत दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details