अहमदनगर - पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील २० गावांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी आणि भोजदरी या गावातील नागरिकांनी श्रमदान केले. यावेळी नोकरी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या गावकऱ्यांनीही एकत्र येत श्रमदानात योगदान दिले.
म्हसवंडी आणि भोजदरीतील गावकऱ्यांनी केले श्रमदान, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात तरुणही सहभागी - water
संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविले जात नाही. अशा पठार भागातील गावांनी दुष्काळापासून मुक्ती मिळविण्याची जिद्द मनी बाळगत पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

आपले गाव पाणीदार करण्यासाठी गावात शोषखड्डे, सलग समपातळी चर, स्टोन बंडीग, शेतीची बांध बंधिस्ती, नाला खोलीकरण, धरणांतील गाळ काढणे असे श्रमदानाची कामे केली जात आहेत. या महाश्रमदान शिबिरात गावकऱ्यांबरोबरच व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर गेलेले गावातील तरुण तरुणीही गावात आले होते. गावातील अबाल वृध्दांनीही उत्साह दाखवत श्रमदान केले आहे.