महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक

येणाऱ्या नवीन वर्षांच्या आणि नाताळ सणाच्या निमित्ताने शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. या संभाव्य गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली.

Meeting of Shirdi villagers convenes for New Year and Christmas Eve crowds planning
नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक संपन्न

By

Published : Dec 24, 2019, 1:58 PM IST

अहमदनगर -नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात. त्यामुळे त्यांना स्थानिकांकडून कोणताही त्रास होऊ नये. संभाव्य गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली. त्यानुसार 24 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत शहरातील सर्व पॉलिसीवाले बंद करण्यात यावेत. असा निर्णय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक संपन्न

हेही वाचा...नो टू सिंगल यूज प्लास्टिक : गाझियाबाद महानगरपालिका राबवत आहे स्तुत्य उपक्रम

शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी शुक्रवारी 20 डिसेंबरला शिर्डी ग्रामसभेत झालेल्या विषयांच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकित आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांना विखेंनी शिर्डीत होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीवर काम करण्यास सांगितले.

हेही वाचा... 24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज

विखेंनी अधिकाऱ्यांना महामार्गावर निमगाव बाह्यवळण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. तसेच त्या ठिकाणी विविध भाषेतील फलक लावावे. त्या फलकावर नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल, असा उल्लेख करावा, अशा सुचना केल्या.

हेही वाचा... #CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले

ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा रक्षक दलाची स्थापना करावी, जेणेकरून गावातील समस्या गावकऱ्यांना सोडवता येतील. प्रसादालयासमोर उभ्या राहणार्‍या रिक्षावाल्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details