अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच अनेकांचे विवाह खोळंबले आहेत. मात्र, जिल्ह्यातील कोल्हार गावात एक आगळा-वेगळा विवाह सोहळा पार पडला. शादाब आणि सिमरन यांनी कबूल, कबूल, कबूल म्हणत एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले.
'कबूल... कबूल... कबूल' म्हणत दिले आयुष्यभराचे वचन, अवघ्या ५ जणांच्या उपस्थितीत पार पडला विवाह - अहमदनगर लग्न बातमी
देशात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात होणारे लग्न खोळंबले आहे. अनेक कुटुंब मुलींच्या लग्नाच्या चिंतेत आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातील सिमरनचे लग्न राहुरीच्या शादाब खान याच्याशी जुळले होते. मात्र, मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे विवाह कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख यांच्या पुढाकारातून मुलीचे आई, वडील आणि मौलाना यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. सिमरन आणि शादाब यांनी कबूल, कबूल, कबूल म्हणत आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले. कोणत्याही थाटामाटाशिवाय, नातेवाईकांशिवाय हा विवाहसोहळ पार पडला.