अहमदनगर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत सध्या स्थगिती आदेश दिलेला असताना होणारी एमपीएससीची परीक्षा आणि राज्य सरकारने घोषित केलेली पोलीस मेगाभरती ही पुढे ढकलावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. जिह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यावेळी उपस्थित होते.
एमपीएससी परीक्षा आणि पोलीस मेगाभर्ती पुढे ढकला, जिल्हा पोलिस बैठकीत मागणी.. एमपीएससी परीक्षा आणि पोलीस मेगाभरती पुढे ढकला, जिल्हा पोलीस बैठकीत मागणी.. हेही वाचा -..तर एमपीएससी परीक्षा केंद्राला संभाजी ब्रिगेड संरक्षण देईल - प्रवीण गायकवाड
'एमपीएससी परीक्षा किंवा मेगा पोलीसभरती रद्द करू नका. तर, आरक्षणाबाबत न्यायालयाकडून योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत पुढे ढकला. सध्या कोरोनामुळे संकटाचा काळ आहे, त्यात परीक्षा घेणे हे अनुचित आहे, तसेच, राज्य सरकार न्यायालयात कमी पडत असल्याची भावना समाजात आहे. न्यायालयाने आरक्षण मुद्द्याला सध्या स्थगिती दिलेली आहे. या परिस्थितीत मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन परीक्षा आणि मेगाभरती पुढे ढकलावी,' असे यावेळी पोलीस प्रशासनाला सांगण्यात आले.
सरकारला मराठा समाजाच्या भावना तातडीने कळवून रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा रद्द न करता पुढे ढकलावी, अशी मागणी यावेळी अनेक मराठा नेत्यांनी केली.
हेही वाचा -पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न करा - अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश