महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मदत न भेटल्याने शिर्डीत अनेकांचे स्वप्न अपूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना घरे बांधून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकार मदत देते. मात्र, शिर्डीमध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना मदतीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही.

Shirdi Pradhan Mantri Awas Yojana news
शिर्डी प्रधानमंत्री आवास योजना माहिती

By

Published : Apr 6, 2021, 10:29 AM IST

अहमदनगर(शिर्डी) - शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 142 घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या घरांसाठी राज्य सरकार 1 लाख रुपये तर केंद्र सरकारने 1 लाख 50 हजार रुपये, अशी एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नोव्हेंबर 2019 नंतर या योजनेतील लाभार्थ्यांना उर्वरित निधी न मिळाल्याने अनेकांची बांधकामे अपूर्ण अवस्थेत राहिली आहेत. 2019 मध्ये 1 कोटी 8 लाख रुपयांचे वाटप या सर्व 142 लाभार्थ्यांना करण्यात आले होते.

नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवजी गोंदकर यांनी निधीसाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले

शिर्डीमध्ये 142 घरांना मंजुरी मिळाली होती. यात तीनशे स्क्वेअर फूट बांधकामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येते. मात्र, संबंधित लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर चौदा महिने उलटूनही पुढील हप्ता न मिळाल्यामुळे घरबांधणी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती लाभार्थ्यांनी दिली.

पाठपुरावा सुरू -

या योजनेअंतर्गत लोकांना निधी का मिळत नाही? पुढील हप्ता का मिळाला नाही, याबाबत चौकशी केली असता नोव्हेंबर 2019 मध्ये 1 कोटी 8 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र. प्रलंबित असलेला निधी राज्य व केंद्र सरकारकडून मिळावा, यासाठी शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा केला जाईल, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवजी गोंदकर यांनी दिली आहे.

त्वरित मदत मिळावी -

अगोदर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी येथील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे. विक्रेत्यांनी बांधकाम साहित्यांचे दर वाढवले आहेत. ज्या नागरिकांनी बांधकामे सुरू केली आहेत. त्या ती पूर्ण करण्यात आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेला निधी त्वरित मिळावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात शिर्डी नगर पंचायतचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

हेही वाचा -चंद्रपूरकरांनो हे घ्या फुकटचे प्रदूषण; जिल्हा प्रशासनाने बंद करण्याचे आदेश देऊनही 23 कोळसा डेपो सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details