अहमदनगर- खळ-खट्याक करणाऱ्या राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढी बद्दल केंद्र सरकारचा नागरिकांना लाडू वाटून निषेध केला. अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी इथे बाजारपेठेतील दुकानदार, नागरिक, वाहनचालक यांना लाडू वाटून हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पारनेर तालुक्यातील मनसैनिक याच पद्धतीचे आंदोलन संपूर्ण तालुक्यात गावोगावी जाऊन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा लाखाचे सूट लागतात, ते याच जनतेच्या पैशातून मौज करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जनता महागाई, पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीने त्रस्त आहे. त्यांच्या जीवनात किमान लाडू खाऊन थोडा आनंद मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर ९६ रुपयांच्या पुढे तर डिझेलचा दर ८६ रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८१० रुपये इतकी झाली आहे. एकूणच इंधन आणि गॅसच्या सततच्या वाढत्या दरवाढीने मध्यमवर्ग आणि गरीब नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नसून विविध मार्गाने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदींचा दहा लाखांचा सूट याच दरवाढीतून-