अहमदनगर -शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या पित्यानेच हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. अंकुश आव्हाड असे उडी मारलेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन रुग्णाच्या पित्यानेच घेतली उडी हेही वाचा -श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?
अंकुश गुलाब आव्हाड (वय 55, रा. अखाडावाडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) वर्षीय व्यक्तीने थेट रुग्णालयाच्या दुसऱ्या मजला वरुन खाली उडी मारली. ही घटना रुग्णालय परिसरात असलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी पाहिल्यानंतर आरडाओरड सुरु केली. यानंतर डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचारी बाहेर धावून आले. त्यानंतर अंकुश यांच्यावर याच रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. आव्हाड यांनी उडी का मारली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आव्हाड यांचे जावई यांनी कुठलाही वाद त्यांच्यात झाले नसल्याचे म्हटले.
हेही वाचा -रामोजी उद्योग समुहाच्या मार्गदर्शी चीटफंडला यंदाचा 'एक्सलन्स बिझनेस अवॉर्ड'
घटनेची माहिती मिळताच, साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनीही रुग्णाच्या नातेवाईक यांची भेट घेतली. उडी मारण्याचे करण विचारले असता नातेवाईक यांनाही माहिती नसल्याचे मुंगळीकरना सांगितले. तर दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांची हेंडसाळ होते आणि उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे संस्थानच्या रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. देशातील क्रमांक 2 चे श्रीमंत देवस्थान म्हणून या संस्थानची ओळख आहे. तरीदेखील संस्थानच्या रुग्णालयात अनेक अडचणींचा सामना रुग्णांबरोबर नातेवाईकांना करावा लागत असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौघुले यांनी केला.
हेही वाचा -माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली...अजित पवारांचा विरोधकांना टोला
अनेक दिवसांपासून शिर्डी ग्रामस्थांकडून रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, साई संस्थान अजूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते या प्रकाराला थांबवता आले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.