अहमदनगर - झाडावरील मधमाशांच्या मोहळाने चावा घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना राहुली तालुक्यातील वरवंडी येथे घडली. बापू मुक्ताजी पंडीत असे मृताचे नाव आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, अहमदनगरमधील घटना - attack
बापू मुक्ताजी पंडीत दुचाकीवरून मुळानगर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरील मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
बापू मुक्ताजी पंडीत दुचाकीवरून मुळानगर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरील मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना त्या रस्त्यावरुन जाणारे विजय राजाबापू कदम व विजय केशव अडसुरे यांनी पाहिली. या दोघांनी पंडीत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मधमाशांच्या हल्ल्यात वरवंडीचे रहिवासी विलास मुरलीधर गायकवाड, डॉ. सरकार, भारत साळवे, गणेश साळवे, भानुदास शिंगाडे हेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी राहुरी येथे हलवले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.