महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने साई संस्थानला ८ लाखांची गाडी भेट - साई मंदीर आणि महिंद्रा समूह न्यूज

शिर्डी साईबाबा संस्थानला महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने यापूर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, कॅम्‍पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍स यु व्‍ही ५००, एक्‍स यु व्‍ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकुण १४ वाहने देणगी स्‍वरुपात देण्यात आलेल्या आहेत.

महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने साई संस्थानला ८ लाखांची गाडी भेट
महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने साई संस्थानला ८ लाखांची गाडी भेट

By

Published : Feb 6, 2021, 6:51 PM IST

Updated : Feb 6, 2021, 6:57 PM IST

अहमदनगर- महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने शिर्डी साईबाबा संस्थानला थार या श्रेणीतील गाडी देणगी स्‍वरुपात देण्यात आली. बाजारात या गाडीची किंमत ८ लाख ३४ हजार रुपये आहे. महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्राचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांनी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍याकडे सदर गाडीची चावी सुपूर्त केली.

महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने साई संस्थानला ८ लाखांची गाडी भेट

या आगोदर १४ गाड्यांची देगणीरुपी भेट
शिर्डी साईबाबा संस्थानला महिंद्रा उद्योग समुहाच्‍यावतीने यापूर्वी व्‍हायोजर, बोलेरो, स्‍कॉर्पिओ, कॅम्‍पर, लोगान, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रॅक्‍टर), एक्‍स यु व्‍ही ५००, एक्‍स यु व्‍ही ३००, मराझो अशा विविध श्रेणीतील एकुण १४ वाहने देणगी स्‍वरुपात देण्यात आलेल्या आहेत. थार या गाडीची संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आणि महिंद्रा उद्योग समुहाचे सी.ई.ओ. विजय नाकारा यांच्‍या हस्‍ते विधिवत पूजा करण्‍यात आली.

यावेळी महिंद्रा अ‌ॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे नासिक विभागाचे प्रमुख प्रदिप देशमुख, जे.एस.प्रसाद, साई संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षिरसागर, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

Last Updated : Feb 6, 2021, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details