अहमदनगर - शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, यानंतर या घटनेचे राज्याच्या राजकीय पटलावर अनेक पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही राजकीय कृती असल्याची टीका केली आहे.
शरद पवारांवर गुन्हा दाखल करणे हि राजकीय कृती, बाळासाहेब थोरात यांची टिका शुक्रवारी शरद पवार हे ईडी कार्यालयात जाणार होते. मात्र, ईडीने त्यांना न येण्याचे पत्र पाठवले, तसेच मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर पवारांनी ईडी मुख्यालयात जाण्याचे टाळले. मात्र, तोपर्यंत राज्यात या घटनेचे मोठे पडसाद उमटले होते. यावर संगमनेर येथे बोलताना, बाळासाहेब थोरात यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
हेही वाचा... शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे
बाळासाहेब थोरात यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- पवारांवर गुन्हा दाखल करणे ही राजकीय कृती, या कृतीचा काँग्रेसकडून निषेध
- पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून पवारांचे राजकारण, त्यांना राज्यात मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच त्यांच्या विरोधात कट कारस्थान होत आहे
- दिल्ली तख्तापुढे न झुकत, शरद पवारांनी महाराष्ट्राचा मराठी बाणा दाखवला आहे
- तसेच अशा प्रकारचा अन्याय जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्र पेटून उठेल, हे आज महाराष्ट्राने दाखवून दिले
- महाराष्ट्रातील जनता आपल्या मतातून सरकारचा या कृतीचा निषेध करेल
- आजवर ईडी हे काय आहे, कोणालाही माहित नव्हते. मात्र केंद्र सरकार आपल्या राजकारणासाठी ईडीचा उपयोग करत आहे
- अनेकांना ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम सरकार करत आहे
- भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांच्या भ्रष्टाचाराची मात्र चर्चा आणी चौकशीही केली जात नाही
हेही वाचा... अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा; कारण गुलदस्त्यात