महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले - कोकणातील पुरग्रस्त बांधवांच्या बातम्या

मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन कोकणातील अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांसाठी विविध वस्तूरूपी मदत जमा करण्यात आली आहे. ती विशेष वाहनातून कोकण पुरसग्रस्त बांधवांसाठी पाठवण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ही मदत पोहच केली जात आहे.

मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले
मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले

By

Published : Jul 31, 2021, 6:38 PM IST

अहमदनगर - मनसे शहर जिल्हाध्यक्ष नितीन भुतारे यांच्या माध्यमातुन कोकणातील अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांसाठी विविध वस्तूरूपी मदत जमा करण्यात आली आहे. ती विशेष वाहनातून कोकण पुरसग्रस्त बांधवांसाठी पाठवण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ही मदत पोहच केली जात आहे. नगर मनसे कोकणवासीयांसोबत-मराठी बंधू भगिनिंच्या पाठीमागे संकट काळात कायम उभा असतो. पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोकणावाशीयांबरोबर आम्हीही तयार आहोत. नगर शहर व शेवगाव तालुका मनसेच्या वतीने ४००० नागरीकांना पाणी, तांदूळ, रग, चादर, बिस्कीट, माचिस, मेणबत्ती, फरसाण, आदी वस्तू सुमारे एक ट्रक भरून पाठवण्यात आल्या आहेत, असे नितीन भुतारे यांनी सांगितले.

मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले

मनसेचे मनोज चव्हाण मदतीच्या नियोजनात-

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिगे, यांनी मनोगत व्यक्त केले. शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवने यांच्या मार्फत ही मदत पूरग्रस्त भागातील कोकणातील चिपळूण या ठिकाणी जाणार आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या मदतीचे सर्व नियोजन मनसेचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्यामार्फत सूरु आहे.

पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा उस्फुर्त सहभाग-

या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, अनिता दिगे, विनोद काकडे, संकेत व्यवहारे, अशोक दातरांगे, पोपट पाथरे, संकेत होसिंग, दिपक दांगट, गणेश शिंदे, गणेश मराठे, समर्थ उकांडे, देवीदास कुलट, तुषार हिरवे शेवगाव तालुका मनसेचे गोकुळ भागवत, संजय वणवे, गणेश डोमकावळे, देविदास हुशार, संदिप देशमुख, विठ्ठल दुधाळ, संतोष शित्रे, अमोल शेळके, ओकांर दगडे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details