अहमदनगर - राज्यातील लांबलेल्या खातेवाटपावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षात कोणाला कोणते खाते द्यायचे, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता संबंधित पक्षाने त्यांच्या मंत्र्यांना जबाबदारी द्यायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
आज किंवा उद्या मंत्र्यांना खातेवाटप होईल, शरद पवार यांची स्पष्टोक्ती... हेही वाचा... वर्धा जिल्ह्याला गारपीट, पावसाचा तडाखा; कापूस, तूरसह संत्रा पिकांचे नुकसान
शरद पवार हे अहमदनगर येथे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांना द्यावयाची खाती, ही अगोदरच पक्षांना दिलेली आहेत. त्यानुसार आज किंवा उद्या त्याचे वाटप होईल, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले.
हेही वाचा...'सरकार पोलिसांना पाठबळ देईल; मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवावी'
खातेवाटपाला उशीर होतोय का? या प्रश्नावर शरद पवार यांनी, यापूर्वीही मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर दोन-एक दिवस लागल्याचे सांगितले. त्यामुळे कोणताही उशीर होत नसल्याचे आणि कोणताही याबाबत गोंधळ नसल्याची स्पष्टोक्ती दिली. एक पक्ष असतानाही उशीर होत होता. मात्र, आता तीन पक्ष असले असले तरीही कोणतीही अडचण नाही. प्रत्येक पक्षाच्या मंत्राला कोणते खाते द्यावयाचे हे आठ दिवसापूर्वी ठरललले असून त्याची घोषणा जास्तीत जास्त उद्यापर्यंत होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.