महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदर पुनावाला यांनी माहिती द्यावी, पोलीस धमक्यांबाबत तपास करतील - गृहराज्यमंत्री - aadhar poonawala

सिरम कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला यांना येणाऱ्या धमक्यांबाबत त्यांनी माहिती पोलिसांना दिल्यास, पोलीस त्या माहितीच्या आधारे संपूर्ण चौकशी करतील, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अहमदनगर येथे दिले.

Maharashtra Cabinet Minister shambhuraj desai on aadhar poonawala
आदर पुनावाला यांनी माहिती द्यावी, पोलीस धमक्यांबाबत तपास करतील - गृहराज्यमंत्री

By

Published : May 2, 2021, 8:16 PM IST

अहमदनगर - सिरम कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला यांना येणाऱ्या धमक्यांबाबत त्यांनी माहिती पोलिसांना दिल्यास, पोलीस त्या माहितीच्या आधारे संपूर्ण चौकशी करतील, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि कोरोना परिस्थितीचा आढावा याबाबत देसाई यांनी आज अहमदनगरचा दौरा केला. यात ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री देसाई बोलताना....

पुनावालांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान -
सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी लंडन येथे दिलेल्या एका मुलाखतीत आपणास शक्तिशाली लोकांकडून धमक्या येत असल्याचे म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गृहराज्यमंत्री देसाई यांना विचारले असता, त्यांनी पुनावाला यांना सरकारने लगेच वाय दर्जाची सुरक्षा पुरवली असल्याचे स्पष्ट करत त्यांना ज्या नंबर वरून धमक्या आले आहेत, त्याबाबत माहिती पोलिसांना दिल्यास पोलीस तातडीने त्याची चौकशी करतील, असे सांगितले.

कोविशील्ड लसींना देश आणि जगभरातून मागणी -
कोरोना संसर्गावर प्रभावशाली असणाऱ्या लसींमध्ये आदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसींना सध्या जगभरातून मोठी मागणी आहे. तर देशात सध्या लसींचा मोठा तुटवडा असल्याने भारतात उत्पादित होणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींचा पुरवठा प्राधान्याने देशात अगोदर व्हावा, असा रेटा आहे. तर कोविशील्ड लस निर्मितीसाठी कच्चा माल अमेरिकेतून येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या लंडनमध्ये असलेल्या आदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत आपणास शक्तिशाली लोकांकडून धमक्या येत असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते आपला प्लांट विदेशात हलवणार याबाबत कथित बातम्याही येत आहेत. त्यामुळे पुनावाला यांची सुरक्षितता ही महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details