अहमदनगर- श्री विशाल गणपती हे अहमदनगरचे ग्रामदैवत आहे. मंगळवारी अक्षय तृतीयेच्या शूभ मुहुर्तावर गणेश मंदिरात तब्बल साडेतीन हजार आंब्यांची आरास मांडून महापूजा करण्यात आली. या विधिवत पूजेवेळी शहरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती.
अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर विशाल गणेश मंदिरात साडेतीन हजार आंब्यांची आरास मांडून महापूजा - fruits
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेचे औचित्य साधून श्री विशाल गणेश मंदिरात ही विधीवत पूजा करण्यात आली.

नवसाला पावणारा श्री विशाल गणेश म्हणून ख्याती आहे. त्यामुळे नगरबरोबरच राज्यातून दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येत असतात. श्री गणेश जयंती, गणेशोत्सव, चतुर्थीसह वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात. अनेक प्रख्यात देवस्थानात विविध उत्सव साजरे होत असताना विशिष्ट दिनी वेगवेगळी पूजा मांडण्यात येत असते. विविध फळे, फुले, अलंकार, पोषाखाने ही पूजा बांधण्यात येत असते. त्याच धर्तीवर नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विविध प्रकारच्या साडेतीन हजार आंब्याचा नैवद्य दाखवण्यात आला.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयाचे औचित्य साधून श्री विशाल गणेश मंदिरात ही विधीवत पूजा करण्यात आली. हे सर्व आंबे प्रसाद म्हणून भाविकांना आणि त्याच बरोबर सेवाभावी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथे प्रसाद रूपाने दिले जाणार आहेत. देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी याबाबतची माहिती दिली.