अहमदनगर - 'अमीरो का सहारा और गरीबो का गुजारा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या साई प्रसादलया समोरून गेल्या दोन वर्षांपासून मध्यप्रेदश येथील साईभक्त मनोज कुमार सोनी यांची पत्नी बेपत्ता झाली आहे. कुणाला दिसल्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल तसेच आपली ओळखही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे अवाहनात्मक फलक घेऊन पती आपल्या दोन मुलांसह पत्नीचा शोध घेत आहे. शिर्डी पोलिसांच्या कामगिरीवर मनोज यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
साईबाबाच्या दारात पत्नी गायब; दोन वर्षे उलटले तरी शिर्डी पोलिसांचा तपास ढिम्म हेही वाचा - शुभ कल्याण मल्टीस्टेटचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मैत्रेय चिटफंडचाही तपास वेगाने
साईबाबांच्या दर्शनासाठी ऑगस्ट 2017 मध्ये मध्यप्रदेश येथील साईभक्त मनोज कुमार सोनी आपल्या पत्नी व दोन मुलांसह आले होते. साई समाधीच्या दर्शनानंतर मनोज आपल्या परिवारासह साई संस्थानच्या साई प्रसादलयात जेवनासाठी गेले. जेवण करुण बाहेर आल्यानंतर मनोज सोनी आपल्या दोन मुलांशी खेळत असताना अचानक त्यांची पत्नी दीप्ती सोनी गायब झाल्या. शोध सुरू केला मात्र कुठेही मिळून न आल्याने मनोज सोनी यांनी या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला. मात्र, पत्नी शिर्डीतून बेपत्ता होऊन दोन वर्षे उलटले आहेत. तरिही ही शिर्डी पोलिसांकडून त्यांच्या पत्नीचा शोध लागला नाही. दरम्यान पती मनोज यांनी थेट मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
गायब महिला - दिप्ती सोनी (मध्यप्रदेश) अहमदनगर पोलीस अधिक्षकाने या प्रकरणी शोध मोहिमेची जबाबदारी घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत शिर्डी पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, 2017 पेक्षा 2018 मध्ये हरवण्याचे प्रमाण वाढले आहे. शिर्डीमध्ये हरवणाऱ्या व्यक्ती घरातून नाराज होऊन किंवा मुलांना गुण कमी पडल्याने घर सोडल्याचे समोर आले आहे. शिर्डीत मोठ्या प्रमाणात देशातील विवीध राज्यातून भक्त येतात, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिर्डी दिपक गंधाले यानी दिली आहे.
हेही वाचा - वेश्यागमनाच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकाने वारंगनाला जखमी करून प्रियकराला केले ठार